
“साप्ताहिक पुण्यमत किसान डायरी प्रतीनीधी.
ऑनलाइन पुण्यमत: २२ जुलै २०१५.
देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार कोल्हापूर येथे शुक्रवार, जुलै २०५ मध्येच होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. राज्यात ‘कृष्णा’ साखर कारखान्याची डिस्टिलरी ठरली सर्वोत्कृष्ट; मिळणार राष्ट्रीय पुरस्कार
“साप्ताहिक पुण्यमत किसान डायरी प्रतीनीधी.
सातारा कराड दिनांक २०जुलै२०२५.:
*कराड तालुका येथील रेठरे बुद्रुक येथील “कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला सुरेश भोसले आहे.
देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार कोल्हापूर येथे शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला आहे.
कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नवनवीन प्रयोग करत सभासदांचे हित साधले आहे. कारखान्याच्या डिस्टीलरीमध्ये सर्वोच्च फर्मन्टेशन आणि डिस्टलेशन कार्यक्षमतेसह १२८ टक्के प्रकल्प क्षमतेचा वापर केला आहे. तसेच निर्धारित वेळेत ऑइल कंपन्यांना संपूर्ण इथेनॉल प्रमाणाचा पुरवठा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
त्याचबरोबर सर्व नियामक आणि ग्राहक मानकांची पूर्तता करून, रेक्टिफाइड स्पिरिटची उच्च गुणवत्ता सातत्याने राखली आहे. या सर्व कार्याची नोंद घेत भारतीय शुगर संस्थेने हा पुरस्कार कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर केला आहे.
भारतीय शुगरच्या वतीने कोल्हापूर येथे शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी आयोजित साखर परिषदेच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.
कृष्णा’ची राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्ट्रिक,
“गतवर्षी भारतीय शुगरकडून कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखाना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याच महिन्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने नवी दिल्ली येथे कारखान्याला नुकताच उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आता भारतीय शुगरकडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि कोल्हापूर येथे १८ जुलै २९२५रोजी प्रदान करण्यात आला असल्याची माहिती साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेशबाबा भोसले यांनी दिली आहे.,,