[ केशवनगरसह समाविष्ट गावांच्या नागरी समस्या बाबत अति सिग्र निर्णय घ्या अन्यथा पुणे महानगरपालिकेवर शेतकरी संघटना, शेतकरी कष्टकरी सहकार सफाई कामगार, मसेसं, ममस सह समविचारी संघटनांचे वतीने आसुड मोर्चाचा विठ्ठल पवार राजे, इंजी. राजेंद्र कुंजीर, अनिल ताडगे, मयुर गुजर यांचा मनपा आयुक्तांना इशारा. ]
पुणे दि. २०ऑगस्ट२०२२.
साप्ताहिक पुण्यमत पुणे
केशवनगरसह समाविष्ट गावांच्या नागरी समस्या बाबत अति सिग्र निर्णय घ्या अन्यथा पुणे महानगरपालिकेवर शेतकरी संघटना, शेतकरी कष्टकरी सहकार सफाई कामगार, मसेसं, ममस सह समविचारी संघटनांचे वतीने पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना आसूड मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटना व नागरीकांचे टीमने पुणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे संघटनांच्या वतीने विविध मागण्या करण्यात आलेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे त्यामध्ये वाहतुकीचा मुद्दा पिण्याचे पाणी, रस्ते, रेल्वे ब्रिज ते मुळा मुठा नदीच्या पुलापर्येंत उड्डाणपूल व घन कचऱ्याचा मुद्दे मनपा आयुक्त समोर मांडले सुमारे ३५ मिनिटे चाललेल्या या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे व २५/३० नागरिकांचे टिममध्ये मसेसंचे इंजिनियर राजेंद्र कुंजीर, ममसंचे अनिल ताडगे, संघटनेचे पदाधिकारी व नागरीकांत केशवनगरचे विकास सिंग, धवल व्यास, निशांत मिस्त्री, सतिश पटिल, रंजित लोणकर, मौलिक मेहता, विजयकुमार काकडे, अनिल भांडवलकर, प्रविण धुरडे, संजीव पाटील, रविराणा ऊर्फ प्रेमजितसिंह पवार राजे, महेश गिरी, हिरामण बांदल, दिपक फाळके, बी एस पाटील, , महीला आघाडी अध्यक्षा जयश्री चव्हाण, राजेश्री लंघे, गौरव जाधव अभय पवार मयूर गुजर मराठा महासंघ सचिन आडेकर अध्यक्ष मराठा सेवा संघ पुणे शहर है ऊपस्तीत होते.
यावेळी विविध मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो वाहतुकीचा मुंढवा रेल्वे ब्रिज पासून ते मुळा मुठा नदीपर्यंत ओव्हर ब्रिज मागणी, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले चौक ते केशवनगरचे दोन्ही रोडवरील लोनकर नगर, भोईराजनगर पर्यंत दोन्ही बाजूचे अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भामध्ये गंभीर चर्चा झाली यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्काळ कारवाई चे आदेश दिले गेले. या चर्चेमध्ये रेल्वे ब्रिज पासून मुळा मुठा नदीपर्यंतच्या उड्डाणपुलाला अति तात्काळ मान्यता घेऊन पुलाचे काम लवकर सुरू केले जाईल, तसेच गोदरेज सोसायटी कल्याणी बंगला या मधोमध होणारा खराडी केशवनगर मुळा मुठा नदीवरील उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी त्यासाठी 32 कोटी रुपये निधी व टेंडर तत्काळ मंजूर करु, तसेच केशवनगर मधील रस्ता वाहतुकांची कोंडी कमी करण्यासाठी अजून काय पर्याय उपलब्ध आहे का ते तपासून घेऊ त्या पद्धतीने ती देखील कारवाई तात्काळ करू असे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
त्याचप्रमाणे पिण्याच्या नळ पाणीपुरवठ्यासंदर्भामध्ये लष्कर पाणी पुरवठा विभाग व मनपा प्रशासन तात्काळ निर्णय घेऊन दिवसाला सर्व केशवनगर करांना किमान एक वेळा पाणी देण्याच्या संदर्भात चर्चा झाली तसेच या ठिकाणी मोठ्या पाण्याच्या टाकी, नागरीक गार्डन विकासासाठी, पाणीटाकी बांधकामाच्या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा झालेली आहे. केशवनगर मधील घनकचरा व्यवस्थापन च्या संदर्भामध्ये तत्काळ निर्णय घेत संबंधित विभागाच्या प्रमुख श्रीमती राऊत व अधिकाऱ्यांना सूचना करून काम मार्गी लावण्याचा संदर्भामध्ये आदेश दिले. तसेच मुंढवा रेल्वे ब्रिज ते मुळा मोठा नदी महात्मा फुले चौक केशवनगरच्या भोईनगर, लोनकर नगर पर्यंत त्या दोन्ही बाजूने लोणकर वस्तीपर्यंत दोन्ही बाजूचे, एम एस ई बी चे फीडर फिलर डिप्या पोल अतिक्रमणे काढून रस्त्याच्या डाग डुगीचे काम तत्काळ सुरू करा आणि सर्वप्रथम ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा त्यानंतर मोठ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुणे महानगरपालिका पीएमटी डेपोचे बांधकाम तात्काळ त्या ठिकाणी चिखलमय झालेले असल्यामुळे दुरुस्त करावे त्या ठिकाणी व्यवस्थित बस डेपो बस स्टॉप तयार करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली त्या संदर्भातले व्हिडिओ फुटेज आयुक्तांना दाखवले गेले, त्या ठिकाणची देखील तात्काळ पाहणी करून कामकाज स्वरूप करावे असे देखील यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. यावेळी सर्व मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक, मसेसंचे इंजी. राजेंद्र कुंजीर, ममसचे अनिल ताडगे, मयुर गुजर, संघटनेचे युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर , शेतकरी रंणजीत लोणकर यांनी दिले. यावेळी केशवनगर सह समाविष्ट केलेल्या गावांना जो घरपट्टी व टॅक्स लावलेला आहे तो न वाढवता पूर्वीप्रमाणे घ्यावा कारण या भागाचा जो महसूल महानगरपालिकेला मिळत आहे त्याच्या 20 टक्के देखील काम नवीन गावांमध्ये झालेले नाही त्यामुळे घरांना लावलेल्या वाढीव टॅक्स हा तात्काळ कमी करा अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा देखील यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी श्री देशमुख यांना सांगितले सदर बाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार व टॅक्स संदर्भातली अधिकारी देशमुख यांनी संदर्भात निर्णय घेऊ व तसे नागरिकांना दिलासा देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले. अशी माहिती संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवकाध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी प्रसिद्ध दिलेले पत्रकार म्हटले आहे.
फोटो कॅप्शन. माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन व संघटनेची संघटनेची स्मरणिका भेट देताना विठ्ठल पवार राजे इंजिनियर राजेंद्र कुंजीर अनिल ताडगे रणजीत लोणकर अनिल भांडवलकर, मयुर गुजर, इतर इत्यादी.
मनपा टॅक्स अधिकारी श्री देशमुख यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे, इंजि. राजेंद्रजी कुंजीर, अनिल ताडगे, मयूर गुजर, अनिल भांडवलकर आदी..
