
शेतकरी संघटनेसह एनयूबीसी आंदोलनात सहभागी, राज्यपालांनी राष्ट्रपतींना संघटनेचे पत्र, मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे घ्या, विठ्ठल राजे पवार यांची माहिती.
मुंबई दिनांक ०२ सप्टेंबर २०२५, मराठा मोर्चा : मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय. पण आता महाराष्ट्र राज्यातील अख्खा मराठा समाज एकवटला असून आता मराठा समाजानेच महाराष्ट्र राज्यातील फडणवीस शिंदे पवार या त्रिकूट सरकारला गंभीर स्वरूपाचा इशारा दिलेला आहे. आता, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी कडक उपोषण सुरू केलंले असून जरंगे पाटील यांनी आता पाणी सुद्धा पिणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे मराठा समाजाचे नेतृत्व विक्रमवीर यांच्या जीवित आला संभाव्य धोका या त्रिकूट सरकारकडून दिसून येत असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील अख्खा पाच सहा कोटी मराठा समाज मुंबईत घुसणार आहे असा समाज बांधवाकडून सरकारला इशारा देण्यात आला असल्याची माहिती मराठा आंदोलनाचे समर्थक व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी राज्याचे राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती गृह विभाग यांना पुणे जिल्ह्याचे कलेक्टर यांच्यामार्फत महत्त्वाचे निवेदन दिलेले आहे बाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सरकारच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाहीये. सरकारनं तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांचे सह मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे. तर सरसकट आरक्षणावर कोर्टाच्या निर्णयांचा पेच आहे, त्यामुळे सरकारची हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर चर्चा सुरू असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटलांनी म्हटल आहे.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तर, सामाजिक काम करताना तुम्हाला शिव्या आणि टीका सहन करावी लागते असं प्रत्युत्तर टीकाकारांवर फडणवीसांनी दिले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. तर जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसी नेत्यांनी देखील बैठकींचा सपाटा लावत जरांगेंच्या मागणींचा विरोध केला. आंदोलनाची मागणी आणि विक्रमवीर मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातला अख्खा पाच कोटीहून अधिक मराठा समाज आता मुंबईत घुसणार असल्याची माहिती मराठा समाज व मराठा आंदोलनाचे समर्थक शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्ध दिलेलं पत्रकार म्हटले आहे.
तसेच शाहू महाराज छत्रपती मा ना श्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी मराठा आरक्षण मागणी आंदोलन विक्रमवीर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जाहीर व लेखी पाठिंबा दिला आहे, तर शेतकरी संघटनेने राज्याचे राज्यपाल व देशाचे राष्ट्रपती तसेच प्रधानमंत्री गृहमंत्री यांना हस्तक्षेप करण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशी मागणी केलेली आहे.. राज्य सरकारनं मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांना दिलेलं आश्वास पाळावं असं भाष्य शाहू महाराजांनी आंदोलनावर केलंय. तर ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मराठा समाज हा आर्थिक स्थितीत प्रचंड मागासलेला असून तो आत्महत्या करत असल्याने त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे कायद्याने त्यांना आरक्षण बंधनकारक केलेले आहे ते त्यांना द्यावे असे म्हटले आहे, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी म्हटले आहे की कायदेशीर मार्गाने माननीय न्यायालयाने सकारबमक भूमिका घेत संविधानात दिलेल्या अधिकाराप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीतून विनाशरथ आरक्षण देण्याची भूमिका बजावी आणि मुंबई अथवा मराठा आंदोलकांवर कोणताही अन्याय राज्य सरकारकडून धोकादाडी होणार नाही याची दक्षता राज्याच्या पोलिस मुंबई महापालिका आयुक्त तशीच न्यायालयाने देखील घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे, तर कोणताही उशिर न करता सरकारनं आंदोलनावर मार्ग काढावा अशी मागणी शशिकांत शिंदेंनी केली.
सरकारमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट.
तसेच मराठा आरक्षणाच्या गुलाल उधळूनच जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन गट पडले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक विठ्ठलाचे पवार यांनी अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडावे असे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील विरोधकांनी आरक्षणावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर ओबीसींबाबत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान सत्ताधा-यांनी केलंय. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. मात्र, मनोज पाटील जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करणार की नाही? राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर मधला मार्ग काढणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.